बांधकाम कामगारांना सहकार्य करू : राहुल पाटील पाडळी खुर्द येथे राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगारांना सहकार्य करू : राहुल पाटील पाडळी खुर्द येथे राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन
बांधकाम कामगारांना सहकार्य करू : राहुल पाटील पाडळी खुर्द येथे राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन

बांधकाम कामगारांना सहकार्य करू : राहुल पाटील पाडळी खुर्द येथे राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन

sakal_logo
By

02078
पाडळी खुर्द ः येथे बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना राहुल पाटील. सोबत बाळासाहेब खाडे, सचिन पाटील, संजय सुतार, सुनीता सुतार, शिवाजी कवठेकर.


बांधकाम कामगार संघटना
कार्यालयाचे पाडळी खुर्दला उद्घाटन

कसबा बीड ता. २५ ः कामगार योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटना सक्रिय आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या नूतन कार्यालय उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे होते. यावेळी बांधकाम कामगारांनी शुभेच्छा स्वरूपात संघटनेला वह्या भेट दिल्या.
संस्थापक संजय सुतार म्हणाले, ‘संघटनेच्या माध्यमातून कामगारांची घरकुल, उपचाराची कामे केली. आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रेरणेने बांधकाम कामगारांसाठी हॉस्पिटल उभारण्याचा मनोदय आहे.’ बाळासाहेब खाडे म्हणाले, ‘आमदार हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांसाठी चांगले काम केले. आमदार पी. एन. पाटील यांची ताकद पाठीशी आहे. कामगारांसाठीच्या शासकीय दवाखान्यात चांगले डॉक्टर व सेवा मिळाव्यात यासाठी लढा उभारा. आम्ही सहभागी होऊ.’ यावेळी ठाकरे गटाचे शहर समन्वयक हर्षेल सुर्वे, राजेंद्र सूर्यवंशी, विजय भोसले, जिल्हा संचालिका सुनीता सुतार यांची भाषणे झाली. अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिरोलीचे उपसरपंच सचिन पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, चेतन पाटील, जी. डी. पाटील, माजी पं. स. सदस्य मोहन पाटील, सरपंच तानाजी पालकर, उपसरपंच नीलम कांबळे, चाफोडीचे सरपंच पंढरीनाथ भोपळेंसह संचालक, कामगार उपस्थित होते.