Wed, March 22, 2023

तनुश्री पाटील हिची विज्ञान मेळाव्यासाठी निवड
तनुश्री पाटील हिची विज्ञान मेळाव्यासाठी निवड
Published on : 2 December 2022, 2:09 am
02086
तनुश्री पाटीलची निवड
कसबा बीड ः महे (ता. करवीर) येथील भैरवनाथ हायस्कूलची विद्यार्थिनी तनुश्री सचिन पाटील हिची ठाणे येथील राज्यस्तरीय बालविज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली. मराठी विज्ञान परिषद यांच्यातर्फे ठाणे येथे मेळावा होत आहे. मेळाव्यात दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र विषयांतर्गत तिने अत्याधुनिक छत्री प्रकल्प सादर केला होता. राज्यभरातील ७००० विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बालविज्ञान मेळाव्यासाठी निवड होते. तिला संस्थाध्यक्ष एस. एम. पाटील, सचिव एस. डी. जरग, मुख्याध्यापक, टी. एम.परीट, विज्ञान शिक्षक एस .डी. मुगडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.