
महेच्या श्री कृष्ण पाणी संस्थेत भैरवनाथ जनसेवा पॅनेलची सत्ता
महेच्या श्री कृष्ण पाणी संस्थेत
भैरवनाथ जनसेवा पॅनेलची सत्ता
सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड ता. २३ : महे (ता. करवीर) येथील श्री कृष्ण सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ जनसेवा पॅनेलने सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवली. विरोधी भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलला एक ही जागा राखता आली नाही.
संस्थेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. जनसेवा पॅनेलचे नेतृत्व सज्जन पाटील, बाजीराव जरग, पांडुरंग पाटील, पांडुरंग के पाटील, बुद्धीराज पाटील, कृष्णात ठाणेकर, सर्जेराव नवाळे यांनी केले. तर विरोधी शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व कुंभी कासारी साखर कारखान्याचे नुतन संचालक सर्जेराव हुजरे व पंडित पाटील यांनी केले. विजयी उमेदवार असे, सर्जेराव नारायण जरग, निवृत्ती आण्णाप्पा नवाळे, अरूण मधूकर पाटील, दिनकर आनंदराव पाटील, धोंडीराम शंकर पाटील, निवास शामराव पाटील (वाडी), भगवान हिंदूराव पाटील, बाळू पांडू वाघमारे, सुहास सत्याप्पा लांडगे, शारदा शिवाजी जाधव, वैशाली आनंदा पाटील, केरबा गणपती कांबळे. विजयी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.