
कबनूरमध्ये शिवजयंती उत्साहात
कबनूरमध्ये शिवजयंती उत्साहात
कबनूर ः येथे शिवप्रेमी, विविध संस्था व संघटनांच्या वतीने शिवजयंती तिथीप्रमाणे उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. जय शिवराय कॉर्नर येथे गणेश सुतार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. शिवजयंतीनिमित्त मातोश्री ब्लड सेंटर, चिकोडी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेतले. यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात भगवा रक्षक ग्रुपतर्फे पंचजयंती साजरी केली. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. वाघमोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. जय भवानी कॉर्नर येथे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात अजित खुडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अष्टविनायक कॉर्नर येथे मल्लाप्पा रामपुरे यांनी प्रतिमेचे पूजन केले. दत्तनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, समीर जमादार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. शाहीर संतोष साळुंके (लातूर) यांचा पोवाडा, महाप्रसाद व सोंगी भजन झाले. एकता ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बाळ महाराज व इचलकरंजी शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी प्रतिमा पूजन केले. कागले गल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्या वैशाली कदम यांनी प्रतिमा पूजन केले. सायंकाळी महाप्रसाद झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02800 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..