जलसमृद्ध गाव योजना राबविण्याचा कबनूरला निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसमृद्ध गाव योजना राबविण्याचा कबनूरला निर्णय
जलसमृद्ध गाव योजना राबविण्याचा कबनूरला निर्णय

जलसमृद्ध गाव योजना राबविण्याचा कबनूरला निर्णय

sakal_logo
By

जलसमृद्ध गाव योजना
राबविण्याचा कबनूरला निर्णय
कबनूर, ता. ६ : कबनूरमध्ये जलसमृद्ध गाव ही योजना राबविण्यात यावी. या विषयास सर्वानुमते संमती देण्यात आली. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी सांस्कृतिक भवनात झालेल्या गावसभेस सरपंच शोभा पोवार अध्यक्षस्थानी होत्या.
ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर स्वच्छ व निर्मळ पाणी उपक्रम राबविणे, हरित गाव, सौरऊर्जा निर्मिती, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, जलसमृद्ध गाव, सार्वजनिक स्वच्छतागृह, घरगुती स्वच्छता गृह, सांडपाणी प्रक्रिया आदींबाबत ग्रामविकास अधिकारी आदलिंग यांनी माहिती दिली.
जलस्वराज समृद्धी गाव ही प्रक्रिया गावांमध्ये राबविण्याबाबतचा एकमेव विषय आजच्या गावसभेत घेण्यात आला. यावर चर्चा होऊन सर्वांनी या विषयाला मंजुरी दिली. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा, तसेच शेतीमालाला किमान हमीभाव देण्यात यावा हे दोन्ही विषय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महावीर लिगाडे यांनी मांडून तसा ठराव करावा, असा मुद्दा मांडला. या दोन्ही विषयांना गावसभेने मंजुरी दिली. त्याचबरोबर कृषी अभ्यास दौरा व प्राथमिक आरोग्य केंद्र या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपसरपंच सुधीर पाटील, मधुकर मणेरे, सुधीर लिगाडे, समीर जमादार, रोहिणी स्वामी, महादेव पाटील, धुळगोंडा पाटील, अजित खुडे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदस्या रजनी गुरव यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02804 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top