
टुडे ३
शेतीला दिवसा
वीज देण्याची मागणी
कबनूर ः राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, तसा ठराव करून शासनाकडे पाठवावा, या मागणीचे निवेदन येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सरपंच शोभा पोवार व ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांच्याकडे दिले. महाराष्ट्र वीज महावितरण कंपनी कडून व शासनाकडून सध्या रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करतात. त्यामुळे दिवसा काम करून रात्री पिकाला पाणी पाजण्यासाठी केला शेतकर्यांना शेतात जावे लागते. रात्री साप, गवे सारखे जनावरे फिरतात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बऱ्याच शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. याचा विचार करून सर्व शेतीसाठी दिवसा सलग दहा तास वीजपुरवठा करावा. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील, महावीर लिगाडे, धुळगोंडा पाटील,अजित खुडे, यशवंत चव्हाण, सुभाष सुतार, चंद्रकांत वाकरेकर,बाळू कदम आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02805 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..