
कबनूर गावसभेत विविध विषयांवर चर्चा
कबनूर गावसभेत विविध विषयांवर चर्चा
कबनूर, ता. १३ ः येथील गावसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव केले. गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पोवार होत्या.
ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. २०२१-२२ चा वार्षिक प्रशासन अहवाल वाचन करताना त्यांनी ग्रामनिधी एक कोटी ५२ लाख १४ हजार ६३० रुपये जमा व एक कोटी ३९ लाख २७ हजार २६२ रुपये खर्च झाल्याचे सांगितले. २०२२-२३ चे अंदाजपत्रकाचे वाचन करताना २६ कोटी ५८ लाख २७ हजार अंदाजित जमा व २६ कोटी ५८ लाख ४५ हजार अंदाजित खर्च असल्याचे सांगितले. गावसभेत ग्रामीण रोजगार हमी योजना राबविणे, वैयक्तिक लाभार्थी निवड करणे, विविध ठिकाणी वृक्षारोपण आदी विषयावर चर्चा झाली. उपसरपंच सुधीर पाटील यांनी कबनूरसाठी वारणा नदीतून पाणी आणण्याचा ठराव मांडला. त्यास मंजुरी दिली. ग्रामपंचायत सदस्या वैशाली कदम यांनी विधवांना सन्मानाने जगता यावे. यासाठी विधवा प्रथा बंद करण्यासाठी ग्रामस्थांची सभा बोलवावी असा ठराव मांडला त्यास मंजुरी दिली.
माजी सरपंच मधुकर मणेरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील काडाप्पा, सुधीर लिगाडे, समीर जमादार, नारायण फरांडे, रियाज चिकोडे, सागर चराटे आदी उपस्थित होते. सरपंच शोभा पोवार यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02816 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..