
कबनूरचा पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची ससेहोलपट
कबनूरला पाणीपुरवठा बंद
कबनूर : येथील जलस्वराज योजनेवरील वीजबिलाची थकबाकी रक्कम ग्रामपंचायतीने न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे योजनेवरील पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद झाला आहे. येथील जलस्वराज्य प्रकल्प पाणीपुरवठा योजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, ग्रामपंचायतीने जलस्वराज्य योजनेवरील महावितरण कंपनीचे थकीत वीजबिलाची रक्कम न भरल्यामुळे योजनेवरील वीजपुरवठा खंडित केला आहे. योजनेवरील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन दिवसांमध्ये साडेबारा लाख रुपये भरले आहेत. आणखी साडेसात लाख रुपये भरा, त्यानंतर योजनेवरील वीजपुरवठा सुरू होईल असे विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी दिली. थकबाकीतीत साडेसात लाख भरल्यानंतर पाणीपुरवठा सुरू होणार आहे. तोपर्यंत गावातील नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. नागरिकांनी थकीत पाणीपट्टीची रक्कम भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02817 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..