कबनूरचा पाणी पुरवठा सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरचा पाणी पुरवठा सुरु
कबनूरचा पाणी पुरवठा सुरु

कबनूरचा पाणी पुरवठा सुरु

sakal_logo
By

कबनूरचा पाणीपुरवठा सुरू
कबनूर ः येथे ग्रामपंचायतीतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य प्रकल्पाच्या थकित वीज बिलाचा हप्ता ग्रामपंचायतीने आज भरला. त्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीज पुरवठा सुरू केला. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या कबनूरला जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ग्रामपंचायतीने जलस्वराज्य प्रकल्पाचे थकीत वीज बिल न भरल्याने १२ मे रोजी महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता. परिणामी पाणीपुरवठा बंद झाला. नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले. दरम्यान आज ग्रामपंचायतीने थकित वीज बिलातील सोळा लाख चोवीस हजार रुपयांची रक्कम भरली. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरू केला. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02821 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top