
कबनूरचा घनकचरा प्रकल्प मार्गी लावा
कबनूरचा घनकचरा प्रकल्प मार्गी लावा
सरपंचांसह सदस्यांची मागणी; उपोषण, आत्मदहनाचा इशारा
कबनूर, ता. १८ ः गावातील गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध होऊन घनकचरा प्रकल्प मार्गी लागावा. यासाठी जागा मागणीचा प्रश्न आपण निकालात काढावा. अन्यथा २३ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबनूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य बेमुदत उपोषण, तसेच आत्मदहन आदी मार्गांचा अवलंब करतील, असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिल्याची माहिती सरपंच शोभा पोवार यांनी दिली.
कबनूरची लोकसंख्या ६० ते ६५ हजारच्या आसपास आहे. गावातील गोळा होणारा घनकचरा डंपिंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांचे मोर्चे ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत. गावातून गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ग्रामपंचायतीला मुश्कील झाले आहे. तरी कचरा प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभा करण्यासाठी गायरान जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे. तरी जागा उपलब्ध होण्यासाठी कार्यालयामार्फत सूचना कराव्यात, अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
घनकचरा प्रकल्पासाठीचा जागा मागणी प्रस्ताव दोन वर्षे झाले प्रलंबित आहे. गावातील गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध होऊन घनकचरा प्रश्न मार्गी लागावा. यासाठी जागा मागणीचा प्रश्न निकालात काढावा. अन्यथा सोमवारपासून (ता. २३) आपल्या कार्यालयासमोर कबनूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य बेमुदत उपोषण, आत्मदहन आदी मार्गांचा वापर करतील, याची नोंद घ्यावी. त्यानंतर होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर सरपंच, उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाची प्रत जिल्हा पोलिसप्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, हातकणंगले तहसीलदार, हातकणंगले गटविकास अधिकारी यांना पाठवल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02822 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..