पर्यावरण जागृतीची महिलांची झाडांची भिशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण जागृतीची महिलांची झाडांची भिशी
पर्यावरण जागृतीची महिलांची झाडांची भिशी

पर्यावरण जागृतीची महिलांची झाडांची भिशी

sakal_logo
By

02582

-------
पर्यावरण जागृतीची महिलांची झाडांची भिशी
इचलकरंजी, कबनूरच्या ६० जणींचा उपक्रम; वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही निश्‍चित
रवींद्र पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ३ ः पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी व जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन इचलकरंजी व कबनूरमधील साठ महिलांनी एकत्र येऊन झाडांची भिशी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात डॉक्टर, वकील, उच्चशिक्षित व सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा समावेश आहे. डॉ. ज्योती बडे या अध्यक्षा आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ५) या झाडांची भिशी उपक्रम राबवणाऱ्या महिलांनी कबनूरमध्ये काही भागांत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतलेली आहे. यापूर्वीही या महिलांनी इचलकरंजी येथील शिवतीर्थ व इतर भागांत विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण केले असून त्या त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी पार पाडत आहेत. वृक्षारोपण करताना विशेषतः पाच ते सहा फूट उंचीची झाडे लावली जातात.
महिलांनी झाडांच्या भिशीचे नियम ठरवले आहेत. एका वर्षासाठी ही भिशी असून प्रत्येक सदस्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी गुगल पेद्वारे जमा केले जातात. महिन्याच्या वीस तारखेपर्यंत भिशीतील सदस्यांची बैठक होऊन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा आराखडा ठरवला जातो. त्यानंतर त्या महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत नियोजित जागेत वृक्षारोपण केले जाते. या झाडांच्या भिशीमध्ये महिन्याला जमवलेल्या रकमेतील ऐंशी टक्के रक्कम ही झाडांच्या खरेदीसाठी वापरली जाते. वीस टक्के रक्कम ही झाडांच्या डागडुजीसाठी राखीव ठेवली जाते.
सदस्य वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी वाटून घेतात. उन्हाळ्यात पाणी घालण्याची जबाबदारीही त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पेलली आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाबरोबरच ‘बियाणे बँक’ ची संकल्पना या महिलांची आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02847 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top