
कोरोचीत ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण सोडत
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी
कोरोचीत आरक्षण सोडत
कबनूर, ता. ८ ः कोरोची (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. विस्तार अधिकारी एन. आर. रामण्णा, तलाठी अनंत दांडेकर, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काढली. निवडणूक आयोगाने महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित केल्या. १७ जागांसाठी सहा प्रभागांसाठी सोडत आरक्षण अशी ः प्रभाग १ : सर्वसाधारण स्त्री १ व सर्वसाधारण २, प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री २, सर्वसाधारण १, प्रभाग ३ - सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १, प्रभाग ४ - अनुसूचित जाती (सर्वसाधारण) १, सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १ प्रभाग ५ - अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १. प्रभाग ६- अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, सर्वसाधारण १असे आरक्षण जाहीर केले.
ग्रामसभेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. देवानंद कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष भोरे, उपसरपंच आनंदा लोहार, माजी सरपंच डी. बी. पिस्टे, सर्जेराव माने, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, आनंदा शेट्टी, अमर पाटील, लखन कांबळे, शीतल पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02858 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..