
डांगे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९९ टक्के
2602
हर्शिता शर्मा, प्रज्वल माळी, गणेश चव्हाण
----
गुरुकुल ज्युनिअर कॉलेज
अब्दुललाट : बारावी परीक्षेत येथील गुरुकुल ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. सलग तिसऱ्या वर्षी कॉलेजच्या विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. हर्शिता शर्मा (९०.५० टक्के) हिने प्रथम, गणेश चव्हाण (९०.१७) याने द्वितीय तर प्रज्वल माळी (८९) याने तृतीय क्रमांक मिळवला. एकूण ६६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक चेअरमन गणेश नायकुडे यांनी अभिनंदन केले.
-----------
डीकेएएससी
इचलकरंजी : येथील डीकेएएससी कॉलेजचा बारावीचा निकाल ८२.३० टक्के लागला. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. सायन्स विभागाचा निकाल ९६.९५ टक्के, आर्टस् विभाग ६४.६७ तर कॉमर्स विभागाचा ७९.७४ टक्के लागला. तिन्हीही विभागांचे अनुक्रमे गुणवत्ताधारक विद्यार्थी असे : सायन्स विभाग- समीक्षा पाटील (८७.३३ टक्के), श्रेया पाटील (७८.०० ), सोहम मोहिते (७८.००), अवंतिका भोसले (७६.५० टक्के). कॉमर्स विभाग- राखी हुरकत (८५.३३ ), पारस जैन (८५.१३ ), नयन जैन (८४.६७), आर्टस् विभाग - श्रावणी करंबेळकर (७८.३३ ), करण माने (७८.०० ), स्वप्नाली कांबळे (७६.१७).
---------------
डांगे महाविद्यालय
कबनूर ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९९ टक्के लागला. कला गुणानुक्रमे विद्यार्थी ः प्रणाली माने ८५.८३, प्रतीकराव पाटील ७२.३३, अक्षता नवलगुंदे ६९.८३ टक्के. वाणिज्य ः जगदीश बागल ७९.७७, सुयश कोष्टी ७८, आकाश कोळी ७७.५० टक्के. विज्ञान ः अथर्व पाटील ९०, आदित्य वाघमोडे ८६.६७, यशराज शिणगारे ७९.३३ टक्के. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब डांगे, सचिव ॲड. राजेंद्र डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई यांचे प्रोत्साहन लाभले.
-------------
मणेरे हायस्कूल
कबनूर ः मणेरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. कला गुणानुक्रमे विद्यार्थी ः प्रियांका भोसले ८४, ऋतिका कराळे ७९, आलिया बागवान ७८.६७ टक्के. वाणिज्य ः पृथ्वीराज अनुसे ८६, प्रियांका खोत ८३.५०, पायल बाईत ८२.६७ टक्के. विज्ञान ः श्रीनाथ हेगाना ९३.३३, रिया सूर्यवंशी ९१.६७, प्रज्ञा मदनाईक ९१.१७ टक्के. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, मार्गदर्शक संजय देशपांडे यांचे प्रोत्साहन, तर प्राचार्या ऊर्मिला माने, इन्चार्ज मलिक मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02866 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..