
कबनुर नगरपालिकेबाबत २२ पर्यंत निर्णय शक्य
कबनुर नगरपालिकेबाबत
२२ पर्यंत निर्णय शक्य
दत्ता शिंदे; पुणे आयुक्त कार्यालयात सुनावणी
कबनूर, ता. १७ ः कबनुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रद्द करून ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडे कबनूर नगरपालिका कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी हरकत दाखल केले होती. यावर पुणे आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली. आयुक्तांनी म्हणणे ऐकून घेतले यावर येत्या २२ तारखेपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी दिली.
कबनूर नगरपालिका कृती समितीतर्फे कबनूर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत व्हावे यासाठी लढा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीची मुदत संपल्यामुळे प्रशासनाकडून प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी ३ जून रोजी नवीन जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीचे नवीन मतदार संघ प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली. नगरपालिका व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावाही सुरू आहे. कबनूर नगरपालिका कृती समितीतर्फे निवडणूक आयोग व सचिव यांच्याकडे हरकत दाखल केले. तदनंतर पुणे आयुक्त पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सुनावणी घेतली. सुनावणीवेळी तक्रारदार कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी आपले म्हणणे मांडले. याबाबत २२ जून अखेरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती दत्ता शिंदे यांनी दिली. २२ तारखेपर्यंत निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02877 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..