साजणीत नागरी सुविधांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साजणीत नागरी सुविधांची मागणी
साजणीत नागरी सुविधांची मागणी

साजणीत नागरी सुविधांची मागणी

sakal_logo
By

साजणीत नागरी सुविधांची मागणी
कबनूर, ता.७ ः साजणी (ता. हातकणंगले) येथील शाहूनगरमधील गटारी रस्ते व विहिरीलगत संरक्षण भिंत बांधणे आदी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना भागातील नागरिकांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे, शाहूनगर परिसरात गटारीची व रस्त्याची खूप दूरवस्था झाली आहे. गटारीमधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येऊन जागोजागी साचून राहते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी भागातील नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्तेही खराब झाले आहेत. खराब झालेल्या रस्त्यांची ताबडतोब दुरुस्ती करावी. गौतम कांबळे घर ते कुंभार घरापर्यंतचे, सर्जेराव जांभळे ते अशोक कोळी यांच्या घरापर्यंतची, राजू पाटील ते अक्षय कांबळे यांच्या घरापर्यंत, सयाजी पाटील कारखानापर्यंच्या गटारी दुरुस्त कराव्यात. हेरवाडे यांच्या विहिरीलगत संरक्षणभिंत बांधावी, आठवड्यातून दोन वेळा घंटागाडी फिरवावी तसेच कूपनलिकेत गटारीचे पाणी मिसळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तरी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ही कामे मंजूर करून ताबडतोब करावीत.’
निवेदनावर अर्जुन पाटील, सूर्यकांत पाटील, सीमा सिंग, पंकज सिंग, छाया कुंभार, नीलम कुंभार, अजिंक्य कोळी, बाळासो पाटील, विनायक पाटील, पल्लवी यादव, रामचंद्र पाटील, अनिल यादव, सुभाष मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02968 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..