माकपतर्फे कबनूरमध्ये निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माकपतर्फे कबनूरमध्ये निदर्शने
माकपतर्फे कबनूरमध्ये निदर्शने

माकपतर्फे कबनूरमध्ये निदर्शने

sakal_logo
By

02790

--------
माकपतर्फे कबनूरमध्ये निदर्शने
कबनूर, ता. १० ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे कबनूर ग्रामपंचायतीला विविध मागण्यांसाठी अनेक वेळा निवेदने देऊन त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती तत्काळ व्हावी, या मागणीसाठी कबनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य करा, ग्रामपंचायतीचा व ग्रामसेवकांचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामसेवक गणपत आदलिंग यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी दोन वेळा आपणास विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिलेले आहे. काही प्रश्नांबाबत तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. उदाहरणार्थ गावठाण वाढ. तथापि सर्व संबंधित ग्रामस्थांना त्यासंबंधी नोटीस देऊन रितसर प्रक्रिया पूर्ण करावी, सिटी सर्व्हे अधिकारी यांची मान्यता घ्यावी आणि जिल्हाधिकारी यांना कळवून अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधितांना विनंती करणे आवश्यक आहे. यासंबंधी तत्काळ कार्यवाही करावी. खासगी पाणीपट्टी व सार्वजनिक पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे. पाणी आठ दिवस येत नाही. ज्या दिवशी पाणीपुरवठा सेवा दिली जात नाही त्या दिवशीची पाणीपट्टी लावता येणार नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढ रद्द करावी, घरफाळा वाढीच्या अपिलावर तत्काळ सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केवळ ठराव केला आहे, त्याचा पाठपुरावा करावा. या मागण्या पुढील पंधरा दिवसांत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
निवेदनावर आनंदराव चव्हाण, उत्तमराव चौधरी, सूर्यकांत शेंडे, बंडा पाटील, सुनील खोत, विरुपाक्ष शनीगोड, लतीफ फकीर, विजय कोरे, अनुसया आगलावे, सुभाष माने, राजेंद्र पाटील, दत्ता कुंभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02974 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..