गौरी, गणपतींचे आज विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी, गणपतींचे आज विसर्जन
गौरी, गणपतींचे आज विसर्जन

गौरी, गणपतींचे आज विसर्जन

sakal_logo
By

गौरी, गणपतींचे आज विसर्जन
इचलकरंजी, कबनूरमध्ये विसर्जनासाठी कुंड; कर्मचारी नियुक्त
इचलकरंजी-कबनूर ता. ४ ः घरगुती गणपती, गौरींचे उद्या (ता. ५) विसर्जन आहे. यासाठी इचलकरंजी, कबनूरमध्ये पर्यावरणपूरक गौरी गणपती विसर्जनाची तयारी प्रशासनाकडून केली आहे. इचलकरंजीमध्ये ७२ ठिकाणी विसर्जन कुंडं ठेवलेली आहेत. ७२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहापूर खाणीवरही सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे. काल प्रशासक सुधाकर देशमुख यांनी बैठक घेऊन सूचना केल्या आहेत, तर कबनूरमध्ये तीन ठिकाणी सुविधा उपलब्ध केली आहे.
कबनूर ग्रामपंचायतीने गावामध्ये तीन विविध ठिकाणी घरगुती गणेश विसर्जन व मूर्तीदान उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील व ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी दिली.
उपसरपंच पाटील म्हणाले, ‘या उपक्रमासाठी तीन टॕक्ट्रर-ट्रॉली, निर्माल्यासाठी तीन घंटागाड्या व एकूण २७ कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे. सकाळी साडेआठ वाजता या उपक्रमास सुरवात करण्यात येऊन रात्री गणेश विसर्जन संपेपर्यंत उपक्रम सुरू राहणार आहे. दान केलेल्या गणेश मूर्तींबाबत शासनाच्या सूचनेप्रमाणे योग्य निर्णय घेण्यात येणार आहेत.’
कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक, चंदूर रोड जलस्वराज्य प्रकल्प फिल्टर हाऊस व पंचगंगा साखर कारखाना मेनगेट (गणपती मंदिर) येथे कृत्रिम कुंडांची सुविधा केली आहे. नागरिकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b03008 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..