कबनूरमध्ये लम्पी या रोगाने तीन गायी दगावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरमध्ये  लम्पी या रोगाने तीन गायी दगावल्या
कबनूरमध्ये लम्पी या रोगाने तीन गायी दगावल्या

कबनूरमध्ये लम्पी या रोगाने तीन गायी दगावल्या

sakal_logo
By

लम्पीने कबनूरमध्ये तीन गायी दगावल्या
कबनूर, ता. १५ ः येथे लम्पी या त्वचा रोगाने तीन गायी दगावल्या आहेत. आणखी काही जनावरांना याची लागण झाली आहे. येथील सनदी मळ्यातील संभा टोपकर यांची गाय लम्पीने दगावली आहे. तसेच मगदूम मळ्यातील बाळासाहेब मगदूम यांच्या तीन गायींना लंम्पीची लागण झाली असून त्यातील दोन गाई दगावल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपआयुक्त डॉ. यु. डी. भोसले व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. सी. सर्जे यांनी याबाबत गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जनावरांना रोगाची लक्षणे आढळताच तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच हा रोग उपचाराने बरा होत असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव कमी व्हावा यासाठी कबनूरमध्ये शासनातर्फे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दोन दिवसांत सुमारे ४०० जनावरांना लस दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b03022 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..