‘सामाजिक परिवर्तन’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सामाजिक परिवर्तन’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘सामाजिक परिवर्तन’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

‘सामाजिक परिवर्तन’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By

‘सामाजिक परिवर्तन’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कबनूर, ता. १८ ः रेशनवरील धान्याचा अधिकार सोडण्याबाबत विभागीय आयुक्तांनी काढलेला आदेश रद्द करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अन्नसुरक्षा योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केल्याने दारिद्र्यरेषेखालील अंत्योदय कार्डधारक व केशरी कार्डधारकांना सध्या दोन घास सुखाने खावयास मिळत आहेत. पण सरकारला आता बरेच लोक दारिद्र्यरेषेवर व केशरी कार्डधारकांची परिस्थिती सुधारण्याचा साक्षात्कार झाल्याने विभागीय आयुक्तांनी या योजनेतून आपण अन्नसुरक्षा योजनेतून नावे काढून घ्यावीत, अन्यथा चौकशीत आढळून आल्यास आतापर्यंत योजनेचा घेतलेल्या लाभाचा आर्थिक लाभ कायदेशीर कारवाई करून शासन परत घेईल, असा आदेश काढला आहे. याबाबतचे नियम बदलून शहरी भागासाठी अडीच लाख व ग्रामीण भागासाठी दोन लाख करून योजनेचा लाभ पूर्ववत करावा, अन्यथा महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रमोद कदम, कार्याध्यक्ष अरविंद धरणगुत्तीकर, मुख्य सल्लागार डी. एस. डोणे, सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे, उपाध्यक्ष विद्याधर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b03029 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..