कर्मवीर अण्णांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर अण्णांना अभिवादन
कर्मवीर अण्णांना अभिवादन

कर्मवीर अण्णांना अभिवादन

sakal_logo
By

कबनूरमध्ये कर्मवीरांना अभिवादन
कबनूर ः कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची जोपासना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन एच. एस. मुजावर यांनी केले. कबनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मिताली इंगळे, शिवम भिसे, पर्यवेक्षक एस. जी. उगारे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पी. डी. चौगुले यांचे अध्यक्षीय भाषण झाले. पी. एस. काटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डी. जे. माळी यांनी सूत्रसंचालन केले. डी. एम. दळवी यांनी आभार मानले. तसेच जवाहरनगर हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी केली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के. यू. पोतदार होत्या. ए. एन. माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक पी. आर. चौगुले यांनी ‘कर्मवीर भाऊराव पाटील - जीवनकार्य’ यावर व्याख्यान दिले. बी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. टी. जी. शिंगाडे यांनी आभार मानले.

शहापूर हायस्कूल जयंती
इचलकरंजी : शहापूर हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी केली. सौ. एन. एस. भरमगोंडा यांनी विचार मांडले. विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याचा गौरव पोवाड्याच्या माध्यमातून सादर केला. मुख्याध्यापक एच. आर. कांबळे यांच्या हस्ते कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यवेक्षिका सौ. एस. पी. पाटील, सौ. आर. ए. सुतार, एम. के. सुतार, एम. जी. खटावकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b03038 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..