पंचगंगा साखर कारखान्याची सभासदांना सवलतीच्या दरातील साखर वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा साखर कारखान्याची सभासदांना सवलतीच्या दरातील साखर वाटप
पंचगंगा साखर कारखान्याची सभासदांना सवलतीच्या दरातील साखर वाटप

पंचगंगा साखर कारखान्याची सभासदांना सवलतीच्या दरातील साखर वाटप

sakal_logo
By

पंचगंगा कारखान्यातर्फे सोमवारपासून साखर वाटप
कबनूर, ता.२९ ः गंगानगर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यातर्फे सभासदांना सवलतीच्या दरातील साखरेचे वाटप सोमवार (ता. ३) ते २ नोव्हेंबरपर्यंत कारखाना कार्यस्थळावर केले जाणार असल्याची माहिती कारखान्याने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘ज्या ऊस उत्पादक सभासदांनी हंगाम २०२१-२०२२ मध्ये ऊस पुरवठा केला आहे त्यांना व ‘ब’ वर्ग सभासदांना प्रथम शेअरला २० किलो व पुढील प्रत्येक शेअरला ५ किलो तसेच ऊस पुरवठा न केलेल्या सभासदांना प्रथम शेअरला १५ किलो व पुढील प्रत्येक शेअरला ५ किलो याप्रमाणात पंधरा रुपये प्रति किलो सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येणार आहे. साखर बिलाची रक्कम एटीएम / डेबीट कार्डद्वारे व रोखीने स्वीकारण्यात येणार आहे. तसेच ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. जे सभासद येणार नाहीत त्यांनी अधिकारपत्र व ओळखपत्र देणे आवश्यक आहे. तसेच जे सभासद एकत्रितरित्या अधिकारपत्र हजर करुन  व त्यांच्या सोसायटीमार्फत साखर घेवू इच्छितात त्यांनी सर्व साखर २९ ऑक्टोबरपूर्वी उचल करण्याची आहे, असे पत्रकात म्हटले आहे.