सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी
सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी

सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी

sakal_logo
By

सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी
कबनूर, ता. १३ ः येथील कबनूर हायस्कूल रस्त्यावर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे नळ घातल्यामुळे दोन्ही बाजूला पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना अडचणीचे बनते. ग्रामपंचायतीने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायतीने त्याची खबरदारी न घेतल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला आहे.
येथील मुख्य चौकापासून जवाहरनगरकडे रस्ता जातो. माळभागातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी इनाम मस्जिदजवळील रस्त्यावर दोन मोठे सिमेंटचे नळ टाकून दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात दोन्ही बाजूला पावसाचे पाणी व गटारातून वाहणारे सांडपाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर असलेल्या हायस्कूलला येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनाही साचलेल्या पाण्यातून जावे लागते. रस्त्यावर पाणी साचू नये याची खबरदारी घेऊन ग्रामपंचायतीने योग्य ती व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायतीने दखल न घेतल्यास राष्ट्रवादीतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हे निवेदन स्वीकारून याबाबतची माहिती हातकणंगले पंचायत समितीकडील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली. तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी तेथे येऊन पाहणी केली व योग्य ती व्यवस्था करण्यात येईल अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.