चंदूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय जिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय जिंदे
चंदूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय जिंदे

चंदूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय जिंदे

sakal_logo
By

02960
संजय जिंदे
---------
चंदूर उपसरपंचपदी जिंदे
कबनूर, ता. २३ ः चंदूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय जिंदे यांची बिनविरोध निवड केली. सरपंच अनिता माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड झाली.
ग्रामविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे उपसरपंच भाऊसाहेब रेंदाळे यांनी राजीनामा दिला होता. आघाडीच्या रोटेशन धोरणानुसार जिंदे यांची बिनविरोध निवड केली. त्यांच्या उपसरपंचपदासाठी सूचक फिरोज शेख व अनुमोदक मारुती पुजारी होते. राहुल आवाडे यांच्याहस्ते सत्कार केला. संजय जिंदे म्हणाले,‘ सर्व सदस्यांच्या सोबतीने ग्रामपंचायत अखत्यारीत येणारी विकासकामे, दलित वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन ही कामे अग्रक्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.’
हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, शालन पाटील, वैशाली पाटील, ललिता पुजारी, स्वाती कदम, रूपाली पुजारी, मारुती पुजारी, बाबासाहेब मंगसुळे आदी उपस्थित होते.