‘स्वाभिमानी’तर्फे पंचगंगा कारखान्यास निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वाभिमानी’तर्फे पंचगंगा कारखान्यास निवेदन
‘स्वाभिमानी’तर्फे पंचगंगा कारखान्यास निवेदन

‘स्वाभिमानी’तर्फे पंचगंगा कारखान्यास निवेदन

sakal_logo
By

‘स्वाभिमानी’तर्फे पंचगंगा कारखान्यास निवेदन
कबनूर, ता. २८ ः येथील गंगानगरमधील पंचगंगा सहकारी साखर कारखाना लीज युनिट रेणुका शुगर्सच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २०२२-२३ मधील ऊस गळीत हंगामातील एकरकमी एफआरपी जाहीर करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की चालू वर्षासाठी ३०५० रुपये एफआरपी जाहीर केल्याचे समजते. हे निव्वळ एफआरपीपेक्षा ५६ रुपये कमी जाहीर केलेले आहे. ते मान्य नसून आपणाकडून तोडणी वाहतूक वजा जाता बसणारी ३१०६ रुपये एफआरपी जाहीर करावी. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, हातकणंगले तालुकाध्यक्ष आप्पासो एडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी वठारे, धुळगोंडा पाटील-धुळुसे, महावीर लिगाडे, अरुण मगदूम, ॲड. सुरेश पाटील, पुरंदर पाटील, विश्वास बालिघाटे, बाळासो कदम, प्रकाश पाटील, अमोल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘रेणुका शुगर’चे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत ‘रेणुका शुगर्स’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की कारखान्याकडून एफआरपी अजून जाहीर झालेली नाही.