धडक मोर्चात सहभागाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धडक मोर्चात सहभागाचे आवाहन
धडक मोर्चात सहभागाचे आवाहन

धडक मोर्चात सहभागाचे आवाहन

sakal_logo
By

धडक मोर्चात सहभागाचे आवाहन
कबनूर, ता. ४ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. ७) दुपारी बारा वाजता पुणे येथील साखर संकुलावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून एफआरपी पुन्हा एकरकमी करा, मागील वर्षाची एफआरपी अधिक दोनशे रुपये तातडीने द्या, ऊसतोडणी मजूर ऊसतोडणी महामंडळमार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत, गतवर्षाची सरासरी रिकव्हरीच्याआधारे चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रुपये उचल द्या, तोडणी मशीनने तुटलेल्या उसाचा पालापाचोळ्याची कपात ४.५ टक्के ऐवजी १.५ टक्के करा. यांसह अनेक मागण्या आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील अलका टॉकीज ते साखर संकुल या मार्गे साखर संकुलावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पूर्वनियोजनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा कबनूर यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात मोर्चा यशस्वी करण्यासाठी कबनूरमधून मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सात नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता मोर्चात सहभागी होण्यासाठी कबनूर येथील झेंडा चौकातून प्रयाण करायचे आहे. तरी शेतकरी बांधवांनी धुळगोंडा पाटील, महावीर लिगाडे व महादेव पाटील यांच्याकडे नावे नोंदवावी, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.