कबनूरला कचरा उठावची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरला कचरा उठावची मागणी
कबनूरला कचरा उठावची मागणी

कबनूरला कचरा उठावची मागणी

sakal_logo
By

02986
कबनूर ः येथील अनेक भागात असे कचऱ्याचे ढीग साचले असून काही जणांनी कचऱ्याची पोती भरूनच रस्त्याजवळ टाकल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. (छायाचित्रः रवींद्र पाटील,कबनूर)
----------
कबनूरला कचरा उठावची मागणी
कबनूर, ता. ६ ः येथील ग्रामपंचायतीतर्फे कचरा उठाव करण्याचे थांबवल्याने गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा उठाव तत्काळ करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा नागरिक देत आहेत.
कबनूरची लोकसंख्या साठ हजार असल्याने गावातील कचरा उठाव तत्काळ करणे आवश्यक आहे. मात्र गावातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा करून तो कोठे टाकायचा? याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले नसल्याने अनेक दिवस गावातील कचऱ्याचा उठाव झालेला नाही. त्यामुळे गावातील प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ग्रामपंचायतीने घंटागाडी बंद केल्याने काही लोक कचऱ्याची पोती भरून रस्त्याजवळच टाकत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने गांभीर्याने विचार करून तत्काळ कचरा उठाव करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.