कोरोची गावसभेत मतदारयादीचे वाचन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोची गावसभेत मतदारयादीचे वाचन
कोरोची गावसभेत मतदारयादीचे वाचन

कोरोची गावसभेत मतदारयादीचे वाचन

sakal_logo
By

कोरोची गावसभेत मतदारयादी वाचन
कबनूर, ता.११ ः कोरोची (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीने घेतलेल्या गावसभेत मतदारयादी वाचनासह आचारसंहितेबाबत माहिती दिली. गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा पाटील होत्या. गावसभेत कोरोची पंचायत निवडणूक अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने गावसभेत धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत म्हणून चर्चा होऊ शकली नाही. मतदारयादीचे वाचन केले. मतदारयादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची माहिती देऊन आचारसंहिता पालनाबाबत माहिती दिली. उपसरपंच आनंद लोहार, माजी सरपंच डी. बी. पिस्टे, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, लखन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शितल पाटील, सतीश सूर्यवंशी, पार्वती राक्षे, पुरंदर पाटील, रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते.