मणेरे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सवाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मणेरे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सवाचा प्रारंभ
मणेरे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सवाचा प्रारंभ

मणेरे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सवाचा प्रारंभ

sakal_logo
By

03019
कबनूर ः येथील मणेरे शिक्षण संस्थेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी सागर पाटील, सुधाकरराव मणेरे, धुळोबा पाटील, सुभाष केटकाळे आदी.
----------------
मणेरे हायस्कूलमध्ये क्रीडामहोत्सवाचा प्रारंभ
कबनूर, ता. १८ ः आरोग्यदायी जीवनासाठी खेळ अत्यावश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे प्रतिपादन अतिग्रेचे सरपंच सागर पाटील यांनी केले.
येथील डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कुसुमताई बाल व प्राथमिक विद्यामंदिर मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे होते. प्रमुख पाहुणे सागर पाटील, धुळोबा पाटील यांच्याहस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केतकाळे, प्राचार्या उर्मिला माने, मुख्याध्यापिका तसलीम मणेर, उपमुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे आदी उपस्थित होते. केतकी काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निवास तोडकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली चौगुले यांनी आभार मानले.