पान ६ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ६
पान ६

पान ६

sakal_logo
By

तिळवणीत फिरते लोकअदालत
कबनूर ः तिळवणी (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते विधीसेवा तथा लोकअदालत तिळवणी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले. इचलकरंजी न्यायाधीश एस. डी. वानखेडे त्यांच्या नेतृत्वाखाली अदालतमध्ये बँकेची कर्जवसुली फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वादविवाद, भूसंपादन प्रकरणे व इतर दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दोन प्रकरणांतील दोन्ही बाजूंचे नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये एक वाद मिटवण्यात आला. ग्रामपंचायतकडील थकीत घरफळा प्रकरणातील सतरा लोकांकडून रक्कम वसुली करून घरफाळापोटी ८४ हजार रुपये इतकी जमा झाली. सरपंच राजेश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपसरपंच दीपक गायकवाड, ग्रामसेवक सुजाता कांबळे, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.