आंतरशालेय जिल्हास्तरीय पोस्टर्स स्पर्धेत सौंदर्या पाटील प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरशालेय जिल्हास्तरीय पोस्टर्स स्पर्धेत सौंदर्या पाटील प्रथम
आंतरशालेय जिल्हास्तरीय पोस्टर्स स्पर्धेत सौंदर्या पाटील प्रथम

आंतरशालेय जिल्हास्तरीय पोस्टर्स स्पर्धेत सौंदर्या पाटील प्रथम

sakal_logo
By

03095
कबनूर ः येथील आंतरशालेय जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेतील विजेते मान्यवरांसोबत.
----
पोस्टर स्पर्धेत सौंदर्या पाटील प्रथम
कबनूर, ता. ८ ः येथील सत्यशोधक फौंडेशन आणि राष्ट्र सेवा दलातर्फे के. एम. आवळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय आंतरशालेय पोस्टर स्पर्धेत सौंदर्या पाटील (हिराराम गर्ल्स हायस्कूल, इचलकरंजी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
युवराज वन्नम (तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, इचलकरंजी) याने द्वितीय, अक्षरा खाडे (श्री बालाजी माध्यमिक विद्यालय, इचलकरंजी) हिने तृतीय, अथर्व हिंगमेरे (सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी), निखिल कागवाडे (न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. जिल्ह्यातील ३५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले.
स्पर्धेचे समन्वयक अनिल शिंदे, दिलीपकुमार सुर्यवंशी, शिवकुमार मुरतले यांनी संयोजन केले. परीक्षक म्हणून अनिल शिंदे, अमोल परीट, सुभाष बारटक्के, श्रीरंग मोरे यांनी काम पाहिले. राष्ट्र सेवा दल, इचलकरंजी कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील, रोहित दळवी, दामोदर कोळी, राष्ट्र सेवा दल, कबनूर कार्याध्यक्ष नौशाद शेडबाळे, संघटक प्रमोद आवळे, शरद वास्कर आदी उपस्थित होते.