तिळवणीत ऑनलाईन दाखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिळवणीत ऑनलाईन दाखले
तिळवणीत ऑनलाईन दाखले

तिळवणीत ऑनलाईन दाखले

sakal_logo
By

तिळवणीत ऑनलाईन दाखले
कबनूर ः तिळवणी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभागातर्फे महा-इ-ग्राम सिटीझन कनेक्ट नावाने ॲप सुरू केले आहे. त्यामुळे तिळवणीतील ग्रामस्थांना मोबाईलवर ग्रामपंचायतमधील दाखले घरबसल्या मिळणार आहेत, अशी माहिती सरपंच राजेश पाटील व उपसरपंच दीपक गायकवाड यांनी दिली. तिळवणी ग्रामपंचायतीने महा-इ-ग्राम सिटीजन हे ॲप कार्यान्वित केले आहे. त्यामुळे इंटरनेटची सुविधा असल्यास मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन दाखले मिळवता येणार आहेत. ॲपद्वारे घरफळा व पाणीपट्टीची रक्कम भरता येणार आहे. त्याची ऑनलाईन पावती मिळणार आहे. तरी या सुविधेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.