माणगावातील स्मारकाचे मार्चमध्ये लोकार्पण करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगावातील स्मारकाचे मार्चमध्ये लोकार्पण करावे
माणगावातील स्मारकाचे मार्चमध्ये लोकार्पण करावे

माणगावातील स्मारकाचे मार्चमध्ये लोकार्पण करावे

sakal_logo
By

माणगावातील स्मारकाचे मार्चमध्ये लोकार्पण करावे
महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेतर्फे पालकमंत्र्यांकडे मागणी
कबनूर, ता.२५ ः माणगाव (ता. हातकणंगले) येथील राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण मार्च २०२३ मध्ये करून उर्वरित राष्ट्रीय स्मारकाचे कामाचे नवीन आराखडा मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माणगावमध्ये राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे. यासाठी अनेकवेळा निवेदने, मोर्चाद्वारे शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी शासनाने मान्य केली व २०१६ मध्ये राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी १६९ कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे. प्राथमिक टप्प्यातील तक्याची पुनर्बांधणी इमारत, हॅलो ग्राफिक शो, स्वागत कमान, लंडन हाऊस प्रतिकृती अशी कामे पूर्ण झालेली आहेत. या कामाचे लोकार्पण मार्च २०२३ मध्ये करावे. २०१६ मध्ये केलेला विकास आराखडा जुना झाला असून सध्य परिस्थितीमध्ये नवीन आराखडा तयार करावा व तज्ज्ञ लोकांची समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमावी व राष्ट्रीय स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून कर्मचारी नियुक्त करावेत व प्रत्येक वर्षी शासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून दहा कोटींची तरतूद करावी. लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करून करावी, अशी विनंती केली आहे. निवेदनावर महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कदम, कार्याध्यक्ष अरविंद धरणगुत्तीकर,सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे,खजिनदार डॉ.सुभाष मधाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.