पंचगंगा कारखाना व लायन्स क्लबच्यावतीने ऊसतोड मुजरांसाठी जीवनावश्यक किट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा कारखाना व लायन्स क्लबच्यावतीने ऊसतोड मुजरांसाठी जीवनावश्यक किट
पंचगंगा कारखाना व लायन्स क्लबच्यावतीने ऊसतोड मुजरांसाठी जीवनावश्यक किट

पंचगंगा कारखाना व लायन्स क्लबच्यावतीने ऊसतोड मुजरांसाठी जीवनावश्यक किट

sakal_logo
By

03151
कबनूर ः मजुरांना वस्तूंचे किट वाटप करताना अध्यक्ष पी. एम. पाटील

ंपंचगंगा कारखानास्थळी
मजुरांना वस्तूंचे वाटप
कबनूर ः येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स व लायन्स क्लब, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा साखर कारखाना ऊसतोड मजुरांसाठी सालाबादप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे कीट साखर अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्याहस्ते वाटप झाले. कीटमध्ये पुरुषांसाठी शर्ट व पँट पीस, महिलांसाठी साडी, ब्लाऊज पीस, लहान मुलांना ड्रेस, चादर, स्वेटर यांचा समावेश होता. दीडशे मजुरांना कीट वाटप झाले. उपशेती अधिकारी नामदेव बने यांनी स्वागत केले. यावेळी लाईन्स क्लबचे गव्हर्नर विजयकुमार राठी, अध्यक्ष महेंद्रकुमार बालर, लिंगराज कित्तुरे, सुरेश पाटील, कारखाना संचालक प्रमोद पाटील, असि. जनरल मॅनेजर संजय किल्लेदार, डे. केन मॕनेजर सी. एस.पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. भोरे, के. के. दमानी, कमिटी चेअरमन समिती अध्यक्षा श्रुतिका भंडारी, गायत्री मर्दा, स्वाती राठी उपस्थित होते. संचालक प्रमोद पाटील यांनी आभार मानले.