श्रमसंस्कार ही काळाची गरज

श्रमसंस्कार ही काळाची गरज

03304
नेज ः येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात वैशाली डांगे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. योजना जुगळे, हिराताई मुसाई, प्रा. डॉ. सुनिता तेलसिंगे आदी उपस्थित होते.
-------------
श्रमसंस्कार ही काळाची गरज
वैशाली डांगे; नेज येथे डांगे महाविद्यालयाच्या शिबिराची सांगता
कबनूर, ता. २८ ः श्रमातून मिळालेले यश हे चिरकाल टिकणारे असते. तसेच श्रमसंस्कारातून विद्यार्थ्यांना समाजाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव होते. त्यामुळे श्रमसंस्कार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वैशाली राजेंद्र डांगे यांनी केले.
नेज (ता. हातकणंगले) येथे अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व नेज ग्रामपंचायतीतर्फे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात सौ. डांगे प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. योजना जुगळे होत्या.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. सुनिता तेलसिंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई, प्रा. डॉ. वंदना तांदळे, जयदीप कांबळे, श्रद्धा पाटील, स्वरांजली पोतदार, देशभूषण हावळे, साक्षी टारे, पारस गुमाने, ज्योती नेजकर, माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या डॉ. जुगळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्रा. डॉ. संघमित्रा सरवदे यांनी आभार मानले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी नेज गावामध्ये ग्रामस्वच्छता, रस्तेबांधणी, मंदिर परिसर साफसफाई, गटारींची साफसफाई, शाळेभोवती वृक्षारोपण, बौद्ध मंदिरा भोवतालचे खड्डे बुजवणे अशी समाजोपयोगी कामे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com