पंचगंगा साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह
पंचगंगा साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

पंचगंगा साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

sakal_logo
By

03312
पंचगंगा साखर कारखाना
कबनूर ः येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. कारखान्यात ४ ते ११ मार्च राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ झाला. ध्वजपूजन व प्रारंभ अध्यक्ष पी. एम. पाटील, जनरल मॕनेजर प्रकाश सावंत, प्रशासन मॕनेजर संजय किल्लेदार, प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे, इंटक अध्यक्ष आझाद शेख व मान्यवरांच्या हस्ते​ झाला. पी. एम. पाटील यांनी ध्वजवंदन केल्यावर सर्वांनी ध्वजाला सलामी दिली. यावेळी प्रकाश सावंत यांनी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा शपथ दिली. ‘आपले ध्येय, शून्य नुकसान अशा घोषणा दिल्या. सुरक्षा अधिकारी जाफर सनदी यानी स्वागत केले. पी. एम. पाटील म्हणाले, ‘कामगारांनी सुरक्षा पाळली पाहिजे. सुरक्षितता राखून शून्य अपघाताचे ध्येय ठेवले पाहिजे.’ सावंत म्हणाले, ‘कामगारांच्या सुरक्षेबाबत रेणुका शुगर्स दक्ष असते. कामगारांनी घरातून निघताना व कामावर असताना हेल्मेट वापरावे. सुरक्षा साधने व उपकरणांचा कटाक्षाने वापर करावा.’ यावेळी अभिजित पाटील, रवींद्र गरुड, प्रमोद पाटील, डाॕ. पाटीलसह कारखाना व रेणुका शुगर्सचे कर्मचारी उपस्थित होते. इंटक सदस्य प्रकाश कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.