
जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसानिमित्त कुस्त्यांचे मैदान
कबनूरला १७ ला कुस्ती मैदान
कबनूर ता. १३ : येथील ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसानिमित्त शुक्रवारी (ता. १७) दुपारी चारला पी. एम. पाटील मार्ग येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होईल. मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख (पुणे) विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार (अहमदनगर) यांच्यात आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदान इचलकरंजी पैलवान प्रशांत जगताप विरुद्ध मोतीबाग तालीम कोल्हापूर पैलवान कुमार पाटील यांच्यात आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदान इचलकरंजी पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध पुणे तालीम पैलवान केवल भिंगारे यांच्यात आहे.
तसेच महिलांमध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती स्नेहल पुजारी (इचलकरंजी) विरुद्ध मधुरा कागवाडे (कोतोली) द्वितीय क्रमांकाची कुस्ती सोनाली खोत (इचलकरंजी) विरुद्ध सिद्धी पाटील (गडमुडशिंगी) तृतीय क्रमांकाची कुस्ती पूजा सासणे (इचलकरंजी) विरुद्ध स्नेहल पाटील (कोथळी), चतुर्थ क्रमांकची कुस्ती वेदिका चौगुले (कवठेसार) विरुद्ध तनुजा सदाफळे (कुरुंदवाड) यांच्यात होईल. मैदानात ११० कुस्त्या होतील. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस कै.देवगोंडा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ अशोक पाटील यांचेकडून चांदीची गदा बक्षीस आहे.