चंदूरला महिला दिन सप्ताहाचा समारोप

चंदूरला महिला दिन सप्ताहाचा समारोप

चंदूरला महिला दिन सप्ताहाचा समारोप
कबनूर, ता. १४ ः महिलांच्या कलागुणांना वाव देऊन महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डिकेटीईच्या सचिव सपना आवाडे यांनी केले.
चंदूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीतर्फे आयोजित जागतिक महिला दिन सप्ताह समारोपानिमित्त आयोजित महिला आनंद मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती शालन पाटील होत्या. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवले. ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील, ललिता पुजारी यांची भाषणे झाली. पंचायत समितीच्या माजी सभापती शालन पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष कल्पना भराणी, उद्योजिका संगीता मलकापूरे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, ग्रामपंचायत सदस्या स्वाती कदम, रूपाली पुजारी, अनिता माने, योगिता हळदे, रोहिणी घोरपडे, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, उपसरपंच संजय जिंदे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्या स्नेहल कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com