कबनूरच्या कुस्ती मैदानात बाला शेख विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरच्या कुस्ती मैदानात बाला शेख विजयी
कबनूरच्या कुस्ती मैदानात बाला शेख विजयी

कबनूरच्या कुस्ती मैदानात बाला शेख विजयी

sakal_logo
By

03359
-----------
कबनूरच्या मैदानात बाला रफीक विजेता

एकेरी पटावर योगेश पवार चितपट; स्नेहल पुजारीकडून सिद्धी पाटीलला अस्मान

कबनूर, ता. २० ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसानिमित्त झालेल्या निकाली कुस्ती मैदानात पुण्याचा ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफीक शेखने एकेरी पट डावावर ‘उपमहाराष्ट्र केसरी’ योगेश पवार (अहमदनगर) याला अस्मान दाखवून प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची देवगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ अशोक पाटील यांनी बक्षीस ठेवलेली चांदीची गदा व पारितोषिक पटकावले. पंच म्हणून ‘हिंदकेसरी’ दीनानाथ सिंह यांनी काम पाहिले.
द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत व्यंकोबा मैदान इचलकरंजीच्या प्रशांत जगतापने कुमार पाटील (कोल्हापूर) याला कोंद्या डावावर चितपट केले. पंच म्हणून पोलिस अधिकारी महेश पाटील यांनी काम पाहिले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत व्यंकोबा मैदान इचलकरंजीच्या श्रीमंत भोसलेने पुण्याच्या केवल भिंगारेला हप्रे डावावर पराभूत केले. पंच म्हणून पोलिस अधिकारी पाथरवड यांनी काम पाहिले.
महिला कुस्तीत इचलकरंजीच्या व्यंकोबा मैदानच्या स्नेहल पुजारीने ढाक डावावर गडमुडशिंगीच्या सिद्धी पाटीलला अस्मान दाखवले. कोतोलीची मधुरा कागवाडे व इचलकरंजीची सोनाली खोत यांच्यात अटीतटीचा सामना होऊन कुस्ती बरोबरीत सोडवली. इचलकरंजीच्या पूजा सासनेने कोथळीच्या स्नेहल पाटीलला मंचे डावावर अस्मान दाखवले.
मैदानाचे पूजन पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, अशोकराव पाटील, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याहस्ते झाले. त्यानंतर लहान-मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. कुस्ती मैदानाचे नियोजक अमृता भोसले यांचा सत्कार उरूस समिती व मान्यवरांच्या हस्ते झाला. निवेदक म्हणून ज्योतीराम वाजे, सुकुमार माळी, प्रा. आप्पासाहेब वाघमारे यांनी काम पाहिले. यावेळी प्रमोद पाटील, उपसरपंच सुनील काडाप्पा, सुधीर पाटील, बी. डी. पिष्टे, पापालाल सनदी आदी उपस्थित होते. अशोक पाटील यांनी आभार मानले.