
चंदूरमध्ये बलिदानमास निमित्त रक्तदान शिबिर
03362
चंदूर ः येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दत्तात्रय पाटील, संतोष हत्तीकर आदी
----------------------------
शिबिरात ४०५ जणांचे रक्तदान
कबनूर ः चंदूर (ता. हातकणंगले) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व राष्ट्रीय बजरंग दल शाखा शाहूनगर चंदूरच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान दिनानिमित्त महारक्तदान शिबिर घेण्यात आले.यामध्ये ४०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संयोजकांनी रक्तदात्यांना शिवाजी सावंत लिखित ''छावा''ही कादंबरी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय बजरंग दलाचे संतोष हत्तीकर, दत्तात्रय पाटील, किशोर मोदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, सचिन जनवाडे, पंढरीनाथ ठाणेकर आदी मान्यवरांच्याहस्ते झाले. सलग दोन दिवस झालेल्या रक्तदान शिबिरासाठी सांगली सिव्हीलची लोकल गव्हर्मेंट ब्लड बँक, राष्ट्रीय बजरंग दलाचे गोरक्षक जिल्हाध्यक्ष अनिकेत तानुगडे, तेजस राणे, सुरज लाड, गणेश नाकील, संतोष नाकील, रणजित शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.