व्हॉलीबॉल स्पर्धेत मणेराजुरी स्पोर्ट्स विजेता

व्हॉलीबॉल स्पर्धेत मणेराजुरी स्पोर्ट्स विजेता

03372
कबनूर ः येथील शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या मनेराजुरी स्पोर्ट्स संघास बी. डी. पाटील, मिलिंद कोले, सुनील स्वामी आदिंनी पारितोषिक दिले.
-----
व्हॉलीबॉल स्पर्धेत मणेराजुरी स्पोर्ट्स विजेता
कबनूर, ता. २८ ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरूस समिती व नवयुग युवक मंडळातर्फे घेतलेल्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा जिल्हा मर्यादित एक दिवशीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मणेराजुरी स्पोर्ट्स संघाने प्रथम क्रमांक मिळवून दहा हजार रुपयांचे बक्षीस व चषक पटकावला.
द्वितीय धरणगुत्ती संघ, तृतीय मणेराजुरी युवा फाउंडेशन, चौथा माळशिरस स्पोर्ट्स, पाचवा डोंगराई स्पोर्ट्स, सहावा जयहिंद इचलकरंजी, सातवा मोहोळ संघ व आठव्या क्रमांकचे बक्षीस टेंभुर्णी संघाने मिळवले. स्पर्धेचे उद्‍घाटन श्री शांतिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद कोले, बबलू गांजवे यांनी केले. स्पर्धेत कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या चार जिल्ह्यातील ३० संघ सहभागी झाले. बेस्ट शूटर म्हणून संभाजी भानुसे, धरणगुत्ती व बेस्ट डिफेनसर म्हणून सुशांत पोवार मणेराजुरी यांनी मिळवले. विजेत्या पहिल्या चार संघांना रोख रक्कम व चषक मान्यवरांच्याहस्ते दिले. त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेते सदाशिव माने, बाळू पाटील, गुरुनाथ चौगुले यांचा सन्मान केला. बी. डी. पाटील, माजी सरपंच सुधीर पाटील, सुनील स्वामी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com