डांगे महाविद्यालयात कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांगे महाविद्यालयात कार्यशाळा
डांगे महाविद्यालयात कार्यशाळा

डांगे महाविद्यालयात कार्यशाळा

sakal_logo
By

03382
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात ''मौखिक परंपरेचे स्थानिक इतिहासातील महत्त्व’ या विषयावर डॉ. सुरेश शिखरे यांनी मार्गदर्शन केले.
-----------
डांगे महाविद्यालयात कार्यशाळा
कबनूर, ता. २ ः स्थानिक इतिहासाच्या अभ्यासातून वैश्विक इतिहास समृद्ध होत असतो, असे प्रतिपादन डॉ. सुरेश शिखरे (कोल्हापूर) यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात आयोजित अग्रणी महाविद्यालयाच्या कार्यशाळेत ते बोलत होते. महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेच्या सामंजस्य करारांतर्गत ''मौखिक परंपरेचे स्थानिक इतिहासातील महत्त्व'' या विषयावरील कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. योजना जुगळे होत्या.
कार्यशाळेची भूमिका मांडताना समन्वयक प्रोफेसर डॉ. निरंजन कुलकर्णी म्हणाले, ‘सामान्य माणूस हा इतिहासाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे. इतिहास लिहिताना मौखिक साधानांसारख्या अपारंपरिक साधानांकडे प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे.’ तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. सुरेश शिखरे यांनी स्थानिक इतिहासाची संकल्पना, स्वरूप, व्याप्ती, स्थानिक इतिहास कसा लिहावा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शिका डॉ. संघमित्रा सरवदे यांनी ‘मौखिक परंपरा’ या विषयावर मार्गदर्शन केले. मौखिक परंपरा म्हणजे काय? ती कशी पिढ्यानपिढ्या प्रवाहित होत असते? तिच्या आधारे आपण सामन्यांचा इतिहास कसा लिहू शकतो हे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांनी अलिखित साधनांचे महत्व स्पष्ट केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी रायगोंडा मुधोळे, संदीप इथापे, सचिन कांबळे यांनी सहकार्य केले. प्रा. निलेश कांबळे यांनी आभार मानले.