
कोरोचीमध्ये आजपासून हरीनाम सप्ताह
कोरोचीमध्ये आजपासून हरीनाम सप्ताह
कबनूर, ता. ९ ः कोरोची (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल भजनी मंडळातर्फे सोमवार (ता.१०) पासून विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, नाठाचे अभंग, प्रवचन, किर्तन होणार आहे.
सोमवारी (ता.१०) रमेश जाधव (इचलकरंजी) यांचे प्रवचन, श्रीपाद जाधव (साखरळ, जि. सातारा) यांचे कीर्तन, मंगळवारी (ता. ११) सचिन संकपाळ आळते यांचे प्रवचन, स्वामिनी महिला भजनी मंडळ कोरोची यांचे भजन, शशिकांत चोरगे (पानमळेवाडी जि. सातारा) यांचे कीर्तन, बुधवारी (ता.१२) सुभाष लोहार (कोरोची) यांचे प्रवचन, संजय भोसले (वेळू जि. सातारा) यांचे कीर्तन, गुरुवारी (ता.१३) विलास पाटील (रेंदाळ) यांचे प्रवचन, मंगलमूर्ती महिला भजनी मंडळ, रुई यांचे भजन, अजिंक्य इंगळे (हसुर खुर्द ता.कागल) यांचे कीर्तन, शुक्रवारी (ता.१४) श्रीनिवास काळे (कोंडीग्रे ता. शिरोळ) यांचे प्रवचन, जालिंदर चौगुले (महिम, जि. सोलापूर) यांचे कीर्तन, शनिवारी (ता.१५) विष्णू शामराव रोमने यांचे प्रवचन माऊली महिला भजनी मंडळ, इचलकरंजी यांचे भजन, पांडुरंग शितोळे (आळंदी जि.पुणे) यांचे कीर्तन, रविवारी (ता.१६) श्रीधर सुतार (इचलकरंजी) यांचे प्रवचन, दुपारी दिंडी सोहळा, रामकृष्ण कारंजकर (तासगाव जि. सातारा) यांचे कीर्तन, सोमवारी (ता.१७) पारायण सांगता, बाळासाहेब माने (इचलकरंजी) यांचे काल्याचे किर्तन, महाप्रसाद होणार आहे.