‘रत्नदीप’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रत्नदीप’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
‘रत्नदीप’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

‘रत्नदीप’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

03497
कबनूर ः स्नेहमेळाव्यात रत्नदीप हायस्कूलचे माजी विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.

‘रत्नदीप’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कबनूर, ता. १६ ः गंगानगर येथील रत्नदीप हायस्कूलच्या २००१-२००२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. सर्वांना भेटून सर्वांशी हितगुज व्हावे या उद्देशाने आयोजन केले होते.
याचे उद्‍घाटन मुख्याध्यापक दीपक महाजन यांनी केले. माजी विद्यार्थ्यांतर्फे मुख्याध्यापक दीपक महाजन, गुरुवर्य सुनील स्वामी, विजय देवदास, अण्णासाहेब बेंडे, बाळासाहेब पोवार, शिरीष यादव, व्ही. एस. वाली, दिलीप मिस्त्री, शिक्षकेत्तर कर्मचारी अविनाश पोवार, दीपक पाटील यांचा सत्कार केला. सध्या विविध क्षेत्रात, विविध पदावर कार्यरत असलेल्या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी नितेश पाटील, रामा पाकले, मल्लेश कुंभार, रमेश मिणचे, सचिन कोळी, स्वप्निल कवडे, श्रीकांत चोपडे, अश्विनी मांगलेकर, गीतांजली पवार, ज्योती चौगुले, कविता बेळगावे, सीमा मोरे, अलका बन्ने, वर्षा वरुटे, रसिका शहा, स्वाती देसाई, मंजुळा म्हेत्रे, वैशाली पाटील आदी उपस्थित होते. किशोर कांबळे यांनी स्वागत केले. राजू महान्नवर यांनी प्रास्ताविक केले. मनीषा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नितेश पाटील यांनी आभार मानले.