सोसायटीच्या अमृतमहोत्सवाची रविवारी सांगता

सोसायटीच्या अमृतमहोत्सवाची रविवारी सांगता

सोसायटीच्या अमृतमहोत्सवाची रविवारी सांगता
कबनूर ः चंदूर (ता. हातकणंगले) येथील (कै.) देवगोंडा कलगोंडा पाटील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ रविवारी (ता. २१) होणार आहे. सायंकाळी पाचला चंदूरमधील ग्रामदैवत महासिद्ध मंदिर येथे कणेरीमठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी ही माहिती दिली. सभासदांना भेटवस्तूचे वाटप, संस्थेच्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांचा सत्कार, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘अरुणोदय’ या स्मरणिकेचे प्रकाशन होईल. खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजू आवळे, माजी खासदार राजू शेट्टी आदी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com