
डांगे महाविद्यालयात पारितोषिक वितरण
03507
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. अभिजीत इंगवले. शेजारी विठ्ठलराव मुसाई, हिराताई मुसाई, प्राचार्या डॉ. योजना जुगळे आदी.
---------------
डांगे महाविद्यालयात पारितोषिक वितरण
कबनूर, ता. १८ ः यशाच्या पाठीमागे कठोर परिश्रमाची बाजू असते. ध्येय साध्य होण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, कठोर परिश्रम व नियोजनबद्ध अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो, असे प्रतिपादन डॉ. अभिजीत इंगवले यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई, माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. योजना जुगळे होत्या.
वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके दिली. अश्विनी मळगे, खो-खोमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक विजेता राजवर्धन पाटील, ॲथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक विजेता प्रतीक पाटील, केपटोबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सुबोध कंबोगी, विद्यापीठ स्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व विविध पदावर निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. पीएचडी मार्गदर्शक प्रा. डॉ. मोहन सावंत, प्रा. डॉ. अशोक जाधव प्रोफेसर झाल्याबद्दल, प्रा. डॉ. एकनाथ पाटील, प्रा. डॉ. अमर कांबळे, शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झालेल्या प्रा. डॉ. वंदना तांदळे, प्रा. डॉ. सुनिता तेलसिंगे, प्रा. डॉ. आप्पासाहेब शेळके यांचा सत्कार केला. प्रा. रवींद्र पडवळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मनिष साळुंखे यांनी आभार मानले.