कबनूरला चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद

कबनूरला चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद

कबनूरचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

कबनूर ः येथील जलस्वराज्य योजनेच्या जॅकवेलवरील पाणी उपसा करणारी मोटार नादुरुस्त झाल्याने गावास चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साठ हजार लोकसंख्या असलेल्या कबनूर गावात जलस्वराज्य प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. १७ मे रोजी पहाटे जलस्वराज प्रकल्पाच्या जॅकवेलवरील मोटार नादुरुस्त झाली. दुसरी पर्यायी मोटारही नादुरुस्तच असल्याने जॅकवेलची नादुरुस्त मोटार दुरुस्तीला पाठवण्यात आली.त्यामुळे चार दिवस कबनूर गावचा पाणीपुरवठा बंद आहे. मुळातच गावात प्रत्येक भागात चार ते पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. मात्र ग्रामपंचायतीला पाणी प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने पर्यायी मोटार दुरुस्त आहे का नादुरुस्त आहे याकडे लक्ष नसल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com