ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कबनूरला संप

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कबनूरला संप

03514
कबनूर ः किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कबनूर ग्रामपंचायत कामगारांनी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात धरणे आंदोलन केले.
-------------
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कबनूरला संप
कबनूर, ता. २२ ः येथील ग्रामपंचायत कामगारांनी किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी एक दिवसाचा संप केला.
येथील ग्रामपंचायत कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पगार मिळावा या व इतर मागण्यांसाठी आज श्रमिक जनरल कामगार संघटनेचे आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संप केला. सकाळी कामगारांनी एकत्र येऊन गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली. त्यानंतर कामगारांनी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात येऊन तेथे धरणे आंदोलन केले. यानंतर आप्पा पाटील यांनी यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगीतले.
आंदोलनात औदुंबर साठे, निखिल शिंगे, जयश्री घाडगे, अमित चंदुरे, विठ्ठल कांबळे, अमित भरमगोंडा, रियाज पठाण, उत्तम गेजगे, नागेश कांबळे, दिलीप शिंदे, मीनाक्षी कांबळे, दिलीप कोरवी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com