चंदूरला अरुण सोसायटीचा अमृतमहोत्सव

चंदूरला अरुण सोसायटीचा अमृतमहोत्सव

03521
चंदूर ः येथील कै. देवगोंडा कलगोंडा पाटील अरुण विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात गणपतराव पाटील यांना अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते. (छायाचित्र ः शरद पाटील, चंदूर)
----------
चंदूरला अरुण सोसायटीचा अमृतमहोत्सव
कबनूर, ता. २३ ः शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या देवगोंडा कलगोंडा पाटील अरुण विविध कार्यकारी सेवा संस्थेचे कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी केले.
चंदूर (ता. हातकणंगले) येथील कै. देवगोंडा कलगोंडा पाटील अरुण विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीन मुक्तीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मानपत्र प्रदान केले. यावेळी संस्थेच्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांचा सत्कार, संस्थेच्या सभासदांना भेटवस्तूंचे वाटप, संस्थेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘अरुणोदय’ स्मरणिकेचे प्रकाशन, स्मरणिकेचे संपादक व पत्रकार प्रा. रवींद्र पाटील, संस्थेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष,
तसेच संचालकांचा सत्कार करण्यात आला. खासदार माने, आमदार आवाडे, माजी खासदार शेट्टी, गणपतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, बालाजी उद्योग समूहाचे प्रमुख मदन कारंडे, राजेश पाटील-चंदूरकर, दशरथ मलकापुरे आदी उपस्थित होते. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे निवेदक प्रा. विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष रायगोंडा पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com