चंदूर ग्रामपंचायततर्फे पोलीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

चंदूर ग्रामपंचायततर्फे पोलीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

03527
चंदूर ः मुंबई पोलिसपदी नियुक्ती झाल्याबद्दल पूनम शिवाजी मंगसुळे हिचा सत्कार करताना हातकणंगले पंचायत समितीचे समितीच्या माजी सभापती शालन पाटील. शेजारी सरपंच स्नेहल कांबळे, महेश पाटील, संजय जिंदे आदी.
-----------
पुनम मंगसुळे, सुनिल पुजारीचा
पोलिसपदी नियुक्तीबद्दल सत्कार
कबनूर ता.२६- चंदूर (ता. हातकणंगले) चंदूर ग्रामपंचायतीतर्फे पुनम शिवाजी मंगसुळे व सुनिल विष्णु पुजारी यांची मुंबई पोलिसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला.
पोलिसपदी नियुक्तीबद्दल पूनम मंगसुळे हिचा सत्कार हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती शालन पाटील यांनी केला. सुनील पुजारी याचा सत्कार हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच संजय जिंदे, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी, संदीप कांबळे, बाबासाहेब मंगसुळे, रुपाली पुजारी, भगवान पुजारी, ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे, सचिन पुजारी आदी उपस्थित होते. सरपंच स्नेहल कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसरपंच संजय जिंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com