डांगे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांगे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
डांगे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

डांगे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

03532
हातकणंगले ः माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यास डांगे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
----------
डांगे महाविद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
कबनूर, ता. २८ ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या २००५ च्या ज्युनिअर विभागातील कला शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेहमेळावा झाला. वर्गमित्रांना भेटून सर्वांशी हितगुज व्हावे, या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
ज्युनिअर कॉलेजमधील ते मंथरलेले दिवस, वर्गातील आठवणी, शिस्तप्रिय शिक्षक या आणि अशा कितीतरी आठवणी प्रत्येकजण सांगत होता. शाळा आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत होता. स्नेहमेळाव्याचे उद्‍घाटन प्रा. रवींद्र पाटील यांच्याहस्ते झाले. सध्या विविध क्षेत्रात, विविध पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी महादेव बाबर, रोहन पाटील, अरविंद खोत, नितीन जनवाडे, सागर येडले, अमर वरुटे, शितल हापटे, लीना भावके, पुनम कुंभार, वैशाली खोत, संध्या कोठावळे, प्रशांत सावंत, राजू हुलवान, राणी सावंत, महिमा बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने प्रा. रवींद्र पाटील यांचा सत्कार केला. किरण पाटील यांनी स्वागत केले. प्रशांत सावंत यांनी प्रास्ताविक केले. वैशाली खोत यांनी सूत्रसंचालन केले. पुनम कुंभार यांनी आभार मानले.